टॉप बातम्या

आज अक्षय दुवा कबूल करण्याचा आनंदी दिवस

         
मारेगाव : आज अक्षय तृतीया आणि रमजान ईद. दोन पावन पर्वाचा मिळून चालत आलेला योग. आपली दुवा कबूल व्हावी म्हणुन प्रार्थना करण्याचा तर आरोग्य-सुख समाधान अक्षय राहो अनंदात राहो, असं मनोमन मागण्याचा हा दिवस. दोनही सणानिनित्य उपासनेचा उद्देश एकच.
         
वैशाख महिन्यातील तापलेल्या उन्हाच्या असह्य झळांसोबतच कृत्रिम विघ्नसंतोषी सुर्यांनेही निर्माण केलेल्या तप्त राजकीय झळांचा सद्ध्या धार्मिक उत्सवाच्या आनंदावर विरजन‌ घालण्याचा प्रयत्न हाणून पाडून धार्मिक ऊत्सवाचा केवळ आणि केवळ आनंदोत्सव कसा साजरा करता येईल या कडे लक्ष केंद्रीत केले आहे.
      
काही बोचणारे, टोचणारे, छळणारे मतभेद, कलह सारे मागे ठेवून आपल्या माणसासाठीचं जगणं घडविण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून प्रार्थना करण्यासाठीचा चालून आलेला हा योग्य दिवस.
        
फक्तं स्वतःपुरताच विचार नं करता आपल्या जिवाभावाच्या माणसासाठी कोरोना काळात सर्वांनीच मानवता धर्माचं दर्शन गेल्या वर्षात साऱ्या जगानं अनुभवलं. तेच प्रेम आणि करुणा उराशी कायम ठेवून आजचे आणि यापुढे येणारे सर्व धार्मिक उत्सवाचा आनंद लुण्यासाठी आम्ही सदैव तयार असण्याच चित्र स्पष्ट आहे. हेच आजच्या मंगल दिनी आलेला योग सुचवीत आहे.

सर्व धर्मियांना रमजान ईद व तिज (अक्षय तृतीया) च्या शांती शुभेच्छा!

संचालक तथा मुक्त पत्रकार - रवि घुमे
स्वरधारा संगीत अकॅडमी, मारेगाव 
Previous Post Next Post