बोरवेल पाईप वाहून नेणारा ट्रक मेंढोली जवळ झाला पलटी

सह्याद्री | चौफेर न्यूज 

वणी : बोरवेलचा धावत्या सहाय्यक ट्रक वाहणाचे समोरील टायर फुटले आणि वाहन पलटी झाले. त्यात एका युवा मजूराचा दबून मृत्यू झाला. ही घटना मेंढोली शिवारातील सूर्यभान मेश्राम यांच्या शेताजवळ आज २९ मे ला दुपारच्या सुमारास घडली.

रामेन अमृतलाल पुसाम (२०) रा. सोनपरी जि. बालाघाट (मध्यप्रदेश) असे दुर्दैवी मजूर मृतकाचे नाव आहे. तर अशोक कलमू, मक्खन उईके व दिनेश गटपल्ली हे जखमी झाले आहेत. 
शिरपूर कडून मेंढोलीकडे बोरवेल पाईप घेवून जात असतांना ट्रक क्र. (MH 29 TO579) हा दरम्यान, मेंढोली गावाजवळ ट्रक चा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला जावून पलटी झाले. या अपघातात काम करणाऱ्या रामेन पुसाम चा दबून दुर्दैव मृत्यू झाला. तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
वणी येथील सय्यद सरफराज यांच्या मालकीचा हा बोरवेल पाईप वाहून नेणारा ट्रक असून घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रकच्या खाली दबलेल्या युवा मजुराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम 184,304 (अ) 337,338 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 

बोरवेल पाईप वाहून नेणारा ट्रक मेंढोली जवळ झाला पलटी बोरवेल पाईप वाहून नेणारा ट्रक मेंढोली जवळ झाला पलटी Reviewed by सह्याद्री चौफेर on May 29, 2022 Rating: 5
Powered by Blogger.