योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : बहुतांश उपविभागीय क्षेत्रात आघाडीची विविध सहकार सोसायटी वर चलती असल्याचे चित्र असताना मात्र, झरी तालुक्यातील कटली बोरगाव येथील सहकारी संस्था सोसायटी निवडणूकित भाजपा गोंडवाना पॅनल चा १३ पैकी १३ ही सर्व उमेदवार विजयी झाले.
त्यामुळे या सोसायटी वर बाकी पक्षाला आपला ताबा मिळवता आला नसून, सर्वांचा बट्याबोळ झाला आहे. या सोसायटीच्या अध्यक्ष पदी हेमंत मडावी तर उपाध्यक्ष पदी वसंत गेडाम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मुन्ना उर्फ सुरेश बोलेनवार, बंडू आडे, सचिव किशोर काळे व निवडून आलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
कटली बोरगाव सोसायटी वर भाजपा-गोंडवाना चा दणदणीत विजय
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 29, 2022
Rating:
