विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्यचार करून गर्भधारण केले. याबाबत पिडित मुलीने मुलाकडे लग्नाचा हट्ट केला असता पिडित मुलीला दुचाकी वाहनाने उडुन टाकण्याची धमकी दिली असल्याने मुलीच्या पोटात दिवसेंदिवस पोटात अंकुर वाढत असल्याने पिडित मुलीने पोलिस ठाणे गाठून आरोपी विरूद्ध तक्रार दिली.
स्वप्निल अय्या टेकाम (२१) रा. मेंढणी, ता मारेगाव असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार एक वर्षापासुन सुरू होता. पिडित मुलगी ही एक महिन्यांची गर्भवती असताना मुलाकडे लग्नाचा हट्ट केला असता तो मी नव्हेच म्हणत लग्नासाठी नाकार दिला असल्याने पिडित मुलीच्या पोटात दिवसेंदिवस सहा महिन्यांचे अंकुर वाढत असल्याने पिडित मुलीने (ता.९) मे रोज सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास मारेगाव पोलिस ठाणे गाठून स्वप्नील याच्या विरुद्ध पिडित मुलीने तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलीसांनी तक्रार नोंदवून ३७६,३७६(२) ५०६ बाललैंगिक अत्याचार नुसार कलम ४,६ आरोपी विरोध गुन्हे दाखल करून आरोपीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलिस करत आहे.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करण्याऱ्या युवकाला ठोकल्या बेड्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 10, 2022
Rating:
