टॉप बातम्या

विवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या



कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वेगाव येथे एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार (ता.४) मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास   उघडकीस आली.

मनिषा अनिल कोवे (३०) असे विरहित उडी घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.  आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, घटनेची माहिती पोलीस पाटीलांनी मारेगाव पोलीसांना दिली, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सूत्राच्या माहितीनुसार मंगळवार दि.३ मे रोजी मनिषा शौचालयासाठी घरा बाहेर पडली. परंतु ती घरी न परतल्याने कुटुंबीय व गावांतील नातेवाइकांनी तिचा शोध घेतला असता, तीचा शोध लागला नसल्याने आज दि.४ मे रोजी बुधवारला गावालगत असलेल्या रामदास लांडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये आढळून आली असल्याची माहिती आहे.
मनीषा विहिरीत आढळून आल्याची माहिती गावात पसरताच नागरिकांनी लांडे यांच्या शेताकडे धाव घेतली.
Previous Post Next Post