पिसगांव आदिवासी सोसायटी परत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या ताब्यात

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पिसगांव येथील आदिवासी सोसायटीची निवडणूक (ता.३) एप्रिल रोजी मंगळवारला दोन पॅनल मध्ये काटे की, टक्कर म्हणत संपन्न झाली. विरोधकांना धूळ चाखत,यात शेतकरी विकास परिवर्तन पॅनल चा दणदणीत विजय झाला आहे. सभासदांनी श्री थेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला आपल्या मतांचा कौल दिल्याने विरोधक "चारो खाने चित" झाले आहे.

तालुक्यातील पिसगांव आदिवासी सोसायटी तथा सहकार क्षेत्रात गुणाजी थेरे यांची पकड मजबूत असल्याने विरोधकांना आपलं वर्चस्व सोसायटी वर दाखवता आले नाही. हे सर्वश्रुत आहे. रमजान आणि अक्षय तृतीयाच्या पावन मुहूर्तावर गुणाजी थेरे व मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात शे.वि.प. पॅनलचे तेरा ही उमेदवार बहुमताने निवडून आले. यात विनोद आत्राम, वासुदेव कुमरे, सुदर्शन टेकाम, गुणवंत मडावी, श्रीकृष्ण मडावी, फुलावंती जुमनाके, वंदना सिडाम, दिवाकर हस्ते, विजय घोरपडे, रामकृष्ण येरकाडे, भूषण कोल्हे, राजकुमार पाचभाई व गुणाजी थेरे हे उमेदवार आहेत.
या विजयाचे खरे शिल्पकार एकरा गावातील सभासद यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिल्याने हा विजय खेचून आणता आला. यासाठी बबन काकडे, अविनाश डोंगे, नारायण मांदाडे, दिगांबर नावडे, रायबा आत्राम, शुक्रज दूधकोहळे, सदाशिव मेश्राम, नाना खंडारे, पांडुरंग कापसे व रवि निखाडे यांचे विशेष आभार मानले जात आहे.

या प्रसंगी विजयी सर्व उमेदवारांचे अभिनंदन नेते डॉ महेंद्र लोढा, अंकुश माफूर, आकाश बदकी यांनी रंग उधळून केले.
पिसगांव आदिवासी सोसायटी परत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या ताब्यात पिसगांव आदिवासी सोसायटी परत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलच्या ताब्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on May 04, 2022 Rating: 5
Powered by Blogger.