कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे,ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ते फुटून उखडले आहे. पावसाळ्यात हेच खड्डे जीवघेणे ठरत असतात. तरी प्रशासन सुस्त आहे.
"आताच झाला रस्ता अन ही अवदशा रस्त्याची" असे प्रवाशी बोलून जातात. रस्ते बनवायला करोडो रुपये खर्च होतात, वणी नांदेपेरा बायपास ते मार्डी या मार्गाने क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने या मार्गाने प्रवास करणारे किंबहुना रस्त्यावरील गावकरी परेशान झाले आहे.
ट्रक रेतीचे असो वा कोळशाचे सदर रस्त्याने साईड दिल्या जात नाही. नंबर लावण्याच्या चक्कर मध्ये भरधाव वेगाने वाहन चालविल्या जातात. अशा वेगाने चालणाऱ्या कित्येक वाहने रस्त्याच्या कडेला फसल्याची चित्रे या मार्गांवर पाहायला मिळतात. परिणामी अपघाताचे प्रमाणात वाढ झाली असून, प्रवाशांना जीव मुठीत घेवून मार्गांवर प्रवास करावा लागतो.
ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याचे मोठया प्रमाणात नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 30, 2022
Rating:
