टॉप बातम्या

वनोजा सोसायटी वर शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : वनोजा (देवी) येथे विविध कार्यकारी संस्था सोसायटी वर शेतकरी विकास आघाडी पॅनल चा  (ता.30) मार्च रोजी दणदणीत विजय झाला. 

शे वि आ चे नेते उपसरपंच श्री जनार्दन गाडगे व युवा नेते श्री प्रशांत भाऊ भंडारी यांचे नेतृत्वात तसेच श्री संभाजी बहिरे यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक लढवण्यात आली. यात विजयी उमेदवार कृष्णाराव पुनवटकर, गोवर्धन टोंगे, प्रभाकर ढवळे, शंकर वैद्य, शोभाताई नागपुरे, जाईबाई टोंगे, रामभाऊ पिदूरकर, मारोती नगराळे, टीवलू टोंगे, किशोर धांडे, उमेश राजूरकर, हे विजयी झाले आहे.

शेतकरी विकास आघाडी ला स्पष्ट बहुमत मिळाले याचे सर्वत्र कौतुकासह अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  मतदारांनी आपल्या मतांचा कौल शेविआ ला दिल्याने सर्व मतदारांचे विजयी उमेदवारांनी आभार मानले.
यावेळी विजयी सभेचेअध्यक्ष विठ्ठल जी घाटेहे होते, कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत प्रकाशचंदजी भंडारी यानी केले.

Previous Post Next Post