टॉप बातम्या

दिव्यांगाना ३ टक्के निधीचे चेक सरपंचांनी दिले घरपोच


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : अपंगाना आपल्या हक्काच्या निधीकरिता  अनेकदा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून सुद्धा निधी मिळत नाही, वारंवार मागणी तक्रारी केल्या जातात परंतु कोणीच पुढाकार घेतांना दिसत नाही. मात्र अडेगाव गाव च्या इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला म्हणायला हरकत नाही, येथील सरपंच सीमा लालसरे यांनी अपंग निधीचे चेक घेऊन अपंग बांधवांच्या स्वतः घरी जाऊन दिले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आभार मानले जात आहे.

अपंग बांधवांना कार्यालय गाठण्यास त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून अडेगावच्या सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाने अपंग निधीचे चेक त्यांच्या घरी जाऊन वाटप दिले.

ग्रामपंचायतस्तरावर अनेकदा चकरा मारून सुध्दा निधी मिळत नव्हता त्यामुळे या कठीण काळात दिव्यांगाना विविध समस्या ला सामोरे जावे लागत असतांना चक्क घरपोच निधी आल्याने दिव्यांगात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील जवळपास २३ अपंग बांधवांना त्यांचे हक्काचे ३ टक्के निधी वाटप करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांनी सरपंच सीमा लालसरे, सचिव गवारकर व ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले. यावेळी सरपंच लालसरे यांचे सह ग्रा.पं. कर्मचारी पंकज उईके, ग्रामविकास अधिकारी गवारकर इतर ग्रामपंचायत सदस्य, गावकरी व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post