टॉप बातम्या

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 195 जयंती संपूर्ण भारतात साजरी केली गेली. याच अनुषंगाने मारेगाव येथे जगाला व महिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे परम पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी यवतमाळ पूर्व चे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे अध्यक्ष माननीय श्री भगवान रावजी इंगळे, तालुका अध्यक्ष गौतम मालखेडे, तालुका शाखेचे सरचिटणीस दिलीप पाटील, वसुमित्र वनकर, विशाल ताकसांडे, डेव्हिड गजभिये, संजय जीवने, वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष गौतम दारुंडे, सुधाकर भगत, पुष्पाताई ताकसांडे, केंद्रीय शिक्षिका मंगलाताई इंगळे व इतर अनुयायी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाला साप्ताहिक विदर्भाच्या लेखणीतून चे मुख्य संपादक अजय रायपुरे, डॉक्टर महाकुलकर तहे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त मार्डी चौकातील महामानवांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अध्यक्ष भगवान रावजी इंगळे व इतर मान्यवरांनी आपले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित आपले मत व्यक्त केले. 
Previous Post Next Post