कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वरोरा : आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वरोरा व पंचायत समिती कृषी विभाग वरोरा यांचे संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम सन 2022-2023 हंगामपूर्व मार्गदर्शन तथा तालुक्यातील सर्व कृषी निर्विष्ठा विक्रेत्यांची आढावा सभा (ता.12 एप्रिल) रोज मंगळवारला पंचायत समिती, वरोरा चे सभागृहात घेण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उदघाटक म्हणून मा श्री राजेश राठोड गट विकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती वरोरा हे होते. तसेच प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून मा श्री संजय वानखेडे सहा. गट विकास अधिकारी तथा प्रशासक पंचायत समिती, वरोरा हे होते. तसेच प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून मा श्री पि आर मडावी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक जिल्हा अधिकारी कृषी कार्यालय, चंद्रपूर तसेच मार्गदर्शक म्हणून मा श्री सुशांत गाडेवार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर हे होते.
या प्रसंगी सभेची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक माजी मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांचे प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.
उत्तम दर्जाचे बि बियाणे व रासायनिक खताचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात यावा याबाबत चे मार्गदर्शन मा श्री राजेश राठोड गट विकास अधिकारी यांनी केले.
शेतकऱ्यांना बि बियाणे देताना सदर बियाणाची उगवण क्षमता आपण स्वतः तपासून पाहावी व शेतकऱ्यांना सुद्धा उगवण क्षमता तपासण्याबाबत सांगावे. जेणेकरून कुठल्याही तक्रारी येणार नाही. याबाबत चे मार्गदर्शन मा श्री संजय वानखेडे सहा. गट विकास अधिकारी पंचायत समिती, वरोरा यांनी केले.
कृषी निर्विष्ठा विक्रेत्यांनी कृषी निर्विष्ठा विक्री करताना काय काळजी घ्यावी तसेच आपलेकडे असलेला रासायनिक खताचा साठ्याची उचल करण्याबाबत नियमित शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे, या बाबत प्रसार/प्रसिद्धी करण्यात यावी याबाबत चे मार्गदर्शन मा श्री सुशांत गाडेवार मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी केले.
कृषी निर्विष्ठा विक्रेत्यांनी आपले कृषी निर्विष्ठा विक्री संबधीचे सर्व रेकॉर्ड जसे बियाणे, खत, कीटकनाशक पुस्तक उगमप्रमाणपत्रे व परवाना संबधी सर्व दस्तावेज अपडेट ठेवावे. बिलबुक, पावती बुक, EPOS मशीन मधील असलेला रासायनिक खताचा साठा, सोयाबीन बियाणेबाबत घ्यावयाचं काळजी व गुणनियंत्रण विषयक सखोल मार्गदर्शन मा श्री पि आर मडावी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक यांनी केले.
कृषी निर्विष्ठा विक्रेत्यांकडे EPOS मशीन मध्ये असलेला रासायनिक खताचा साठा 30 एप्रिल पर्यंत आपले कडील नियमित शेतकरी, कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतशील शेतकरी, नियमित ग्राहक यांचेशी संपर्क साधून रासायनिक खताचे आवश्यकतेनुसार उचल करण्यास सांगावे, जैविक कीड नियंत्रण निर्विष्ठा कृषी केंद्रात उपलब्ध कराव्या, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके साठा पुस्तक अद्यावत ठेवावे याबाबत चे मार्गदर्शन जयंत धात्रक कृषि अधिकारी पंचायत समिती, वरोरा यांनी केले.
बियाणे, खते, कीटकनाशके ऑनलाईन नवीन परवाना व नूतनीकरण बाबत माहिती तसेच शेती शाळेला संबंधित कृषी निर्विष्ठा विक्री केंद्र कृषी संचालकांना हजार राहण्याबाबत चे मार्गदर्शन श्री गजेंद्र पुसदेकर कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वरोरा यांनी केले.
कृषी निर्विष्ठा विक्री केंद्र संचालकांना खरीप हंगामामध्ये येणाऱ्या अडचणी ऍग्रो डीलर असोसिएशन चे अध्यक्ष श्री सुरेंद्रजी देठे यांनी मांडल्या सदर अडचणी संबंधाने सर्वाशी चर्चा करण्यात आली व सर्वांचे समाधान करण्यात आले.
कृषी विभाग पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वरोरा आणि सर्व घाऊक किरकोळ निर्विष्ठा विक्रेते यांचे समन्वयाने खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्याच्या दृष्टीने तालुक्याचे नियोजन करण्यात आले.
खरीप हंगाम सन 2022-2023 चे मार्गदर्शन तथा आढावा सभेकारिता श्री चंद्रकिशोर ठाकरे, कृषी अधिकारी, श्री सुधाकर खांडरे, विस्तार अधिकारी ((कृषी) यांनी विशेष सहकार्य केले. सदर सभेकारिता तालुक्यातील सर्व घाऊक व किरकोळ निर्विष्ठा विक्रेते उपस्थित होते. सदर मार्गदर्शन तथा आढावा सभेचे संचालन जयंत धात्रक कृषी अधिकारी यांनी व आभार प्रदर्शन श्री गजेंद्र पुसदेकर कृषी अधिकारी यांनी केले.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन तथा आढावा सभा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 13, 2022
Rating:
