मारेगाव महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल नागपूर येथे

सह्याद्री चौफेर  | कुमार अमोल 

मारेगाव : वनस्पतिशास्त्र व प्राणीशास्त्र विभागानी संयुक्तपणे एकदिवसीय शैक्षणिक सहलीचे नागपूर येथील महाबीज जैवतंत्रज्ञान विभाग व बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय याठिकाणी (ता.७ एप्रिल) रोजी जाण्याचे आयोजन केले होते.

महाबीज जैवतंत्रज्ञान विभागातील प्रमुख श्री. विनोद देशमुख यांनी विभागाला भेट देण्यास परवानगी देऊन तेथील डॉ. दिपाली बोरकर मॅडम यांनी प्लांट टिश्यू कल्चर बद्दल सखोल माहिती दिली. त्यांनी विभागात केळीवर टिश्यू कल्चरने नवीन रोप तयार करून बाजारात व शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत माहिती दिली. या प्रक्रियेत कल्चर करताना लागणारे प्रत्येक साहित्या ला निर्जंतुकीकरण करून त्याचा वापर करणे, मिडीया कशा प्रकारे बनविले जाते तसेच Autoclave, Weighing Balance, Laminar Airflow, Water Distillation plant इत्यादी उपकरणाचा वापर कसा करायचा याबद्दल सखोल माहिती दिली. भविष्यात लिंबू वर्गीय, चिकू, बांबू इत्यादी वनस्पती ची रोप सुद्धा टिश्यू कल्चर या पद्धतीने बनविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर, तेलंगखेडी येथील पुरातन श्री कल्याणेश्वर महादेवाच्या मंदिराला भेट दिली. त्यानंतर गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय याठिकाणी गेलो. अत्यंत देखणीय व नयरम्य असे प्राणी संग्रहालय आहे. हे प्राणी संग्रहालय नैसर्गिक अवस्थेत उभे केले आहे. यामध्ये ५ बिबटे, ७ अस्वली, निलगाय, हरीण व २ वाघ राजकुमार व ली सोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे जी हरण सोडण्यात आली आहेत त्यात काही हरीण पांढऱ्या (Albino) रंगाची आहे. प्रत्येक प्राण्याकरिता एक स्वातंत्र्य भाग व सीमा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्राण्याला दुसऱ्या प्राण्यापासून धोका नाही.
या सहलीकरीता बि. एस. सी. भाग ३ च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सहलीला प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी परवानगी देऊन सहकार्य केले तर प्रा. डॉ. विनोद चव्हाण, प्रा. स्नेहल भांदक्कर, प्रा. डॉ. अनिल अडसरे, प्रा. प्रदीप माकडे, प्रा. डॉ. नितेश राऊत व प्रा. डॉ. सुधीर चिरडे यांनी सहल यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
मारेगाव महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल नागपूर येथे मारेगाव महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र व प्राणीशास्त्र विभागाची शैक्षणिक सहल नागपूर येथे Reviewed by सह्याद्री चौफेर on April 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.