वणी मारेगांवात रामनवमी दरम्यान घडले सर्व धर्मीय एकोप्याचे दर्शन


रवि घुमे | सह्याद्री चौफेर 
       
मारेगाव : मांडवस, हिंदू चा पवित्र नवरात्र चैत्र महिना,मुस्लीमांचा पवित्र रमजान महिना आणि तमाम बहुजनांचे प्रेरणा स्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,शैक्षणिक क्रांतीचे जनक महात्मा फुलेंची जयंती, हनुमान जयंती, गुड फ्रायडे. एकंदरीत हा महिना खऱ्या अर्थाने पवित्रच पवित्र. म्हणजेच हा महिना धर्मांधाला तिलांजली देणारा.

सर्वच पोकळ वास्यांना तिलांजली देत वणी मारेगांव वासीयांनी कुठलाही अनुचित प्रकार नं घडवंता रामनवमी बंधूभावाने,अगदी राष्ट्रसंताचे विचार "या भारतात बंधू भाव नित्य वसूदे" या विचाराने साजरी केली. त्याचप्रमाणे येवू घातलेल्या महामानवाच्या जयंतीतही असंच चित्र बघायला मिळणार आहे.
 
असंही वणी मारेगांव परीसर नेहमी धर्मनिरपेक्षच आहे. ह्या परिसरात इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय शरिक होतात. दिवाळीत सर्व धर्मियांचा सहभाग असतो. रमजान मध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत आम्ही सर्वधर्मीय त्यांच्या पौष्टीक क्षिरखुर्म्यावर यथेच्छ ताव मारतो.
      
वणीमध्ये मुस्लिम संघटनेने रामनवमी
पालखीचे स्वागत करुन रामनवमी शोभायात्रा उत्सव समिती अध्यक्षाचा सत्कार करून एकोप्याचे दर्शन घडवले.
 
वणी मारेगांवात रामनवमी दरम्यान घडले सर्व धर्मीय एकोप्याचे दर्शन वणी मारेगांवात रामनवमी दरम्यान घडले सर्व धर्मीय एकोप्याचे दर्शन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 12, 2022 Rating: 5
Powered by Blogger.