रवि घुमे | सह्याद्री चौफेर
संपूर्ण जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे या भू-पतलांवर जीवन जगणाऱ्या जीवाला सुद्धा कोणताही त्रास न होता जगू द्यावे ही शिकवण देणारे भगवान महावीर यांचा (ता.१४) गुरुवार रोजी जन्म कल्याणक साजरा करण्यात आला आहे. या निमित्ताने तालुक्यातील जैन समुदाय मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील बदकी भवन येथून रथ यात्रा व जैन समाज यांच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. ही प्रभात फेरी शहरातील मुख्य रस्त्याने आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून जैन समाज बांधवानी सामाजिक एकोप्याचे दर्शन करवून दिले. यावेळी बौद्ध बांधवाना साहेबांच्या जयंती च्या शुभेच्छा दिल्या व बौद्ध बांधवानी सुद्धा भगवान महावीर जन्म कल्याणक च्या जैन बांधवाना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान,नगर पंचायत चौकातून फेरी परत भगवान महावीर च्या शिकवणी चे नारे देत "अहिंसा प्रथम धर्म", जियो और जीने दो चा मार्ग अवलंबत प्रशासनाला सहकार्य करत प्रभात फेरीचे समापन भवनात झाले. बदकी भवन पासून काढण्यात आलेल्या शोभा यात्रेने संपूर्ण शहर वासियांचे लक्ष वेधून घेतले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक जैन मारेगाव श्री संघ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षिता, सिद्धार्थ मुनोत यांनी केले. कार्यक्रम अध्यक्ष माणिकचंद कोटेचा, प्रमुख पाहुणे मारेगावचे नगराध्यक्ष डॉ. मस्की, प्रशांत भंडारी, रतनलाल सुराणा, बाघराम, सिसोदिया, सुरेश झामड, शांतीलाल दुगड, व किंगरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्रची प्रस्तुती स्नेहा भंसाली, स्वागतगीत प्रतिभा तातेड, महाविरांचा जप प्रशांत भंडारी, अनिल बोथरा, मेघा दुगड यांनी केले.
या प्रसंगी भगवान महावीर जन्म कल्याणक दिनी नृत्य प्रस्तुत करण्यात आले. यात बहू मंडल मारेगाव तसेच लब्धी भंडारी, सिद्धी दुगड, नेहा, रिया दुगड, त्रिशा, सांची भंसाली, भ्रमण दुगड, आकाश कोचर, गुणगुण, मुनमून, भाविक झामड यांनी नृत्य सादर केली.
यावेळी मार्गदर्शनपर भाषण विनोद भंसाली, रमेश झामड, प्रशांत भंडारी, संदेश झामड, कांतीलाल दुगड यांनी केले. या कार्यक्रमाला राळेगाव, वडकी, पिंपळापूर, कुंभा, मार्डी, वनोजा देवी, येडशी, खैरी, मजरा, खडकी, पोहणा व मारेगाव शहर येथील मोठया संख्येने जैन समुदाय उपस्थित होता.
भगवान महावीर जन्म कल्याणक समिती मारेगाव च्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रशांत भंडारी यांनी केले, त्यांनंतर गौतम प्रसाद चा कार्यक्रम झाला.
भगवान महावीर जन्म कल्याणक मारेगाव नगरीत शांततेत साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 15, 2022
Rating:
