विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : आईवडिलांच्या सोबत दुचाकी वर बसून जाणाऱ्या ३ वर्षीय बालिकेचा अज्ञात चारचाकी वाहनाच्या धक्याने मोटर सायकल वरून पडून तिचा मृत्यू झाला. ही घटना मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे घडली.
केळापूर तालुक्यातील रुंझा येथील रहिवासी गुंजन शाम पारशिवे ही बालिका आपल्या आईवडिलांच्या सोबत मोटारसायकल वर बसून रुंझाहुन चिंचमंडळ येथे येत असताना (ता. १४) एप्रिल ला गुरूवारच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान, अज्ञात चारचाकी वाहनाने धक्का दिला, यात बालिकेचा मृत्यू झाला.
मार्डी चिंचमंडळ खैरी या मार्गाने नेहमी जड वाहतूक मोठया प्रमाणात येर जाऱ्या करीत असतात, मोठया वाहणाचा लख्ख प्रकाश लहान वाहनावर भारी पाडतो त्यामुळे समोरचे वाहन नेमक कुठलं याचा अंदाज येत नाही. परिणामी समोरील वाहणाचा प्रकाश डोळ्यावर पडल्याने दुचाकीस्वाराला समोर काहीच दिसले नसल्याने मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वर बसलेली ३ वर्षीय बालिका ही मोटारसायकल वरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली.
लगेचच गुंजन ला जखमी अवस्थेत वणी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता, प्राथमिक तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी बालिकेला मृत घोषित केले.
मोटरसायकल वरून खाली पडून ३ वर्षीय बालिकेचा मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 15, 2022
Rating:
