ग्रामपंचायत पांढूर्णा आदर्श येथीलसूक्ष्म नियोजन योजनेकरिता निवड

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनाअंतर्गत दश वार्षिक नियोजन/आराखड्यासाठी २०२२-२०२३ करिता पांदुर्णा आदर्श/ग्रामपंचायतीची निवड झाली असून त्या आराखड्यामुळे "मागेल त्याला काम" ही लक्षात घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठी पाहिजे ते समृध्दी बजेट घेणे आवश्यक आहे. चमु निवासी दिवसाची कुटुंब सर्वेक्षण कारुन गावफेरी, शिवरफेरी व गावासभा घेऊन दहा वर्षाचा आराखडा बनविण्यात आला आहे. ह्या आराखड्याचा योग्य तऱ्हेने अंमलबजावणी झाल्यास “ मी समृध्द तर गाव समृध्द, गाव समृध्द तर मी समृध्द, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृध्द" ही संकल्पना साध्य होणार आहे . 

यावेळी पी.एम. डांबकर प्रामुख्याने ह्या आराखड्यासाठी एपीओ कलीम शेख, पीटीओ तायडे, अभियंता संजय रामटेके, कसंबे, राठोड, संघटक ऑपरेटर ठोंबरे तसेच गावातुन सरपंच रत्नदीप यादवराव पवार, सचिव संतोष पराते, तलाठी सुर्यवंशी, कोतवाल किरण मोरे उपसरपंच शितल पांडव, सदस्य नारायण आरु, वेणुताई लंगडे, आरती गडपायले, वंदना राठोड , सोपान आरु, नितीन जाधव, केवल पवार, रोहित राठोड, आरती देशमुख आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे पांढर्णा आदर्श गावाची पुन्हा आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल होणार निश्चित .
ग्रामपंचायत पांढूर्णा आदर्श येथीलसूक्ष्म नियोजन योजनेकरिता निवड ग्रामपंचायत पांढूर्णा आदर्श येथीलसूक्ष्म नियोजन योजनेकरिता निवड Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.