चिंचमंडळ ग्रामपंचायत सदस्याच्या पती विरोधात विविध कलमानव्यये गुन्हे दाखल तर, सचिवावर विनयभंगाची तक्रार
कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ ग्रामपंचायत ही काहींना काही कारणास्तव वादाच्या भोवऱ्यात नेहमी चर्चेत असते. अशीच काहीशी चर्चा सध्या तालुक्यात ऐकायला मिळत आहे. महिला सदस्यांच्या पती आणि सचिवांच्या कुस्ती ची चित्रफीत सोशल मीडियावर वायरल होतांना दिसत आहे. या प्रकरणात पोलिसात परस्पर विरोधी तक्रार दिल्याचे माहिती आहे.
सविस्तर असे की, चिंचमंडळ येथे मासिक सभा घेण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मासिक सभेचा वेळ निघून गेल्यानंतर सरपंच व एक महिला सदस्य हजर झाले. महिला सदस्यांनी पाणी प्रश्न व यापूर्वी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचे जाब विचारण्यात आला. मात्र, यावर समाधान झाले नसल्याने महिला सदस्याचे पती सचिवास भेटण्यास गेले. यावेळी दोघात शाब्दिक खडाजंगी होत महिला सदस्यांच्या पतीने थेट सचिवांच्या कानशिलात मारल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी मारेगाव पोलिसात केली.
एका महिला सदस्यांनीही ही ग्रामसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार पोलिसात दाखल केल्याने ग्रामसेवक खरात यांचेवर विनयभंगाचा तर शासकीय कामात अडथळा निर्माण व अनु.जाती / जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत सातपुते यांचेवर मारेगाव पोलिसात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
शुक्रवार (ता.२९) रोजी चिंचमंडळ ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे दुपारी १२ वाजता आयोजन करण्यात आले होते. या सभेकरिता ग्रामसेवक किशोर चिंदाजी खरात व ग्रामपंचायत कर्मचारी वेळेपूर्वी उपस्थित होते. मात्र, विहित वेळेतील ग्रामसभा सदस्यांच्या अनुपस्थिने झाली नाही.
दरम्यान, या मासिक सभेकरिता ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री दिवाकर सातपुते या उशीरा पतीसह उपस्थित झाल्या. यावेळेस ग्रा.पं. सदस्या भाग्यश्री सातपुते यांनी जुन्या माहिती अधिकारातील कागदपत्रे आणि अलीकडेच गावातील पेटत असलेला पाणी प्रश्नांवर शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळेस सदस्य सातपुते यांचे पतीने शासकीय कामात अडथळा निर्माण करित मारहाण केल्याची तक्रार ग्रामसेवक किशोर खरात यांनी पोलिसात तक्रार दिली. तर महिला सदस्याने ग्रामसेवकाने वाईट हेतूने हात पकडत विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दिली.
तक्रारीनुसार ग्रामसेवक किशोर खरात यांचेवर विनयभंगाचा तर, दिवाकर सातपुते यांचेवर शासकीय कामात अडथळा आणि अनु.जाती/जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत मारेगाव पोलिसात शुक्रवारला रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलिस करित आहेत.
चिंचमंडळ ग्रामपंचायत सदस्याच्या पती विरोधात विविध कलमानव्यये गुन्हे दाखल तर, सचिवावर विनयभंगाची तक्रार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 30, 2022
Rating:
