टॉप बातम्या

कु. सिमरन शेख मारेगाव तालुक्यात प्रथम

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 
 
मारेगाव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या संगणक टायपिंग परीक्षाचा निकाल जाहिर झाला असून या परिक्षेत मारेगाव येथील कु सिमरन शेख हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

ही परीक्षा मागील नोव्हेबर २०२१ मध्ये पार पडली होती. या परीक्षेचा निकाल १८ एप्रिल २०२२ ला जाहीर झाला आहे. निकालात मारेगाव शहरातील विद्यार्थिनी कु. सिमरन शेख हिला संगणक, टंकलेखन इग्रजी - ४० या परिक्षेत ९३ टक्के गुण मिळाले, त्यामुळे ती तालुक्यातुन प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसेच संगणक, टंकलेखन इग्रजी - ३० या परिक्षेत तीने ८३ टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.

आपल्या यशाचे श्रेय ती कुमार कॉम्पुटर टायपिंग इंस्टिट्यूट चे प्राचार्य राजू घूमे तथा शिक्षकासह आई वडिलांना देत आहे.
Previous Post Next Post