लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय येथे एक दिवसीय केक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 
           
यवतमाळ : वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय गृहअर्थशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय केक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉ. कुंटे सर यांनी भूषविले. तसेच गृहअर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रो.डॉ.लता वाघेला मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ सरिता देशमुख मॅडम यांनी संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन केले. बीए भाग 3 गृह अर्थशास्त्र या विषयाची विद्यार्थिनी कु. संस्कृती जावळकर हिने विद्यार्थिनींना केक प्रशिक्षण दिले. त्यामध्ये तिने चॉकलेट केक,चॉकलेट केक, डॉल केक इत्यादी शिकविले. केकचे वेगवेगळे फ्लेवर,नोझल चा उपयोग,केक डेकोरेशन या सर्व बाबी तिने अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थिनींना समजावून सांगितले. या कार्यक्रमाकरिता एकूण 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे सरांनी विद्यार्थिनींना कमवा आणि शिका या बद्दल मार्गदर्शन केले. आपल्या कला कौशल्याचा उपयोग करून आपल्याला अर्थार्जन करता येणे गरजेचे आहे हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सपना दाढे यांनी केले तर प्रा.डॉ. मनीषा क्षीरसागर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. डॉ. सरिता देशमुख, प्रा.डॉ.मनीषा क्षीरसागर, प्रा सपना दाढे आणि विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले.
लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय येथे एक दिवसीय केक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय येथे एक दिवसीय केक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on April 20, 2022 Rating: 5
Powered by Blogger.