टॉप बातम्या

पोलीस पाटील यांचा एक दिवसाचा संप


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेने विविध मागन्या मंजूर करण्यात याव्या याकरिता तहसील कार्याल्यासमोर एक दिवसाचा संप करण्यात आला. पोलीस पाटील यांचा मानधन किमान वेतना प्रमाने १५ हजार दयावे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून सुधारीता आदेश दयावे, पोलीस यांचे नुतनीकरण कायमचे बंद करावे. पोलीस पाटीलाचे वयोमर्यादा ६० वरुन ६५ करण्यात यावे. पोलीस पाटीलांना सन २०१२ पासून प्रवास भत्ता मिळावा. अतीरीक्त ९० दिवसाचा मानधन मिळावा. मृत्यु पावलेल्या पोलीस पाटील यांच्या कुटुंबांना ५० लाखाचा विमाकवच मिळावा.

अश्या मागणी करिता पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुनिल धवने, उपाध्यक्ष नारायणरेड्डी यालावार, सचिव विनोद पेरकावार यांच्या मार्गदर्शन खाली शेंद्रे, प्रभाकर पवार, प्रकाश मेश्राम, अंकुश मेश्राम, पुरुषोत्तम जीवतोडे, बापूजी पेंदोर, बरशेट्टीवार, दिनेश सिडाम, चरणदास गंड्रतवार, उत्तम भोयर यांच्या सह पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post