जीव धोक्यात घालून सरपणासाठी महिला जंगलात...

चेतन पवार |सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : दारव्हा तालुक्यात दिवसेंदिवस स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडत आहे.गरिबाचे रॉकेल तर गायब झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील गोर गरीबांना आता पुन्हा एकदा चुली कडे वळावे लागत आहे.चुल म्हटले की सरपण आवश्यक आहे.हे सरपण गोळा करण्यासाठी वन्य प्राण्यांच्या दहशतीत ग्रामीण भागातील महिला भल्या पहाटेच जंगल परिसराकडे जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
    
सकाळी लवकर उठून इतर सर्व कामे बाजूला सारून जंगलात जाऊन वाळलेले सरपण गोळा केले जाते.त्यानंतर त्यांची माेळी बांधून घरी आणली जाते.एका महिन्यातच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे.अश्यावेळी उन्हाळ्यातच सरपण गोळा करून वाळवुन घरात अथवा गोठ्यात पावसाळ्यासाठी जमा करून ठेवले जात आहे. हे सरपण गोळा करण्यासाठी जंगल व शेतालगत फिरावे लागते, अशा वेळी अनेक संकटाचा सामना सरपण गोळा करणाऱ्या महिलांना करावा लागतो.यामध्ये वाघ, रानडुक्कर, अस्वल,कोल्हा,आदी वन्य प्राण्यांचा हल्ला होण्याची भीती असते.सरपण गोळा करताना आशा वन्यप्राण्यांच्या हल्ला करण्याच्या अनेक घटना तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घडल्या आहेत.या सर्व संकटांचा सामना करुण उन्हातान्हात उपाशीपोटी महिला आपल्या कुटुंबासाठी सरपण गोळा करून घरी आणताना दिसून येत आहेत.

एका माेळीसाठी दिवसभर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. बरेचदा सरपण हे जवळपास मिळत नसल्याने पायपीट करीत अनेक किलोमीटरपर्यंत महिलांना भटकंती करावी लागत आहे. कधी-कधी ५ ते १० किलोमीटर अंतर तुडवूनही सरपण मिळत नाही. अशावेळी केव्हा निराशा हाती लागते. अनेकदा शेतमालकाच्या तर कधी वन अधिकाराच्या रोषाला बळी पडावे लागते.
जीव धोक्यात घालून सरपणासाठी महिला जंगलात... जीव धोक्यात घालून सरपणासाठी महिला जंगलात... Reviewed by सह्याद्री चौफेर on April 30, 2022 Rating: 5
Powered by Blogger.