मारहाण प्रकरणात पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांसह इतरांवर गुन्हे दाखल

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदेपेरा चौफुली लगत एका पत्रकाराला अडवून शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुख व साथीदारांनी हॉकी स्ट्रिकने वार केले. मात्र, डोक्यावर येणारा वार झेलल्याने मोठा अनर्थ टळला. यासंबंधी पत्रकार रवी ढुमणे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली असता "त्या" हल्लेखोर माजी तालुका प्रमुखासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  
     
वणी शहरातील नांदेपेरा मार्गालगत असलेल्या चामाटे लेआऊट भागात पत्रकार रवी ढुमणे हे राहतात. कार्यालयीन कामासाठी ते तहसील कार्यालयात गेले होते. कार्यालयीन काम आटोपून घराकडे येत असताना त्यांना थंड पेय घेऊ म्हणून एकाने पाचारण केले. थंड पेय घेतल्यानंतर रवी ढुमणे हे आपल्या दुचाकीवर बसले आणि घराकडे जाण्यास निघत असतांना शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख गणपत लेडांगे, हे आपल्या साथीदारांसह चारचाकी वाहनात बसून आले आले व त्यांनी मागून हॉकी स्ट्रिक ने वार केले. तिघे जण मागून मारत होते. व गाडीतून गणपत लेडांगे उतरला त्याने लाकडी दांडा काढून डोक्यावर प्रहार करणार, तितक्यात बचाव करण्यासाठी पत्रकार रवी ढुमणे यांनी हॉकी स्ट्रिक चे वार हातावर झेलून स्वतःचा बचाव केला. यात ढुमणे यांना कमरेत,मानेवर, पाठीत आणि दोन्ही हाताला जबर मार लागला आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे. या घटनेची तक्रार त्यांनी पोलीसात दिली त्या तक्रारीतून सेनेचा माजी तालुकाप्रमुख गणपत लेडांगे,महेश चौधरी, व इतराविरुद्ध भा दं वि ३२४' ५०४, ५०६,/ ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत. परिणामी पत्रकारावर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. आता मात्र, या गंभीर प्रकरणाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची गरज आहे.



मारहाण प्रकरणात पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांसह इतरांवर गुन्हे दाखल मारहाण प्रकरणात पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांसह इतरांवर गुन्हे दाखल Reviewed by सह्याद्री चौफेर on April 16, 2022 Rating: 5
Powered by Blogger.