टॉप बातम्या

लातुरात होणार विश्वकर्मा समाजातील राज्यस्तरीय वधु वर पालक मेळावा


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

लातूर : विश्वकर्मा समाजातील अनेक मुले-मुली विवाहास पात्र असूनही या महागाईच्या काळात प्रवास करून स्थळ पाहणे अतिशय अवघड झाले असून या दोन वर्षाच्या करोनाच्या ताळेबंदी मुळे आणि अनेकांचे विवाह जुळणे कठीण झाली होती ही बाब लक्षात घेऊन विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी ठीक दहा वाजता विश्वकर्मा गार्डन फंक्शन हॉल बार्शी रोड लातूर येथे आयोजित केला आहे. या तरी विश्वकर्मा समाजातील विवाह इच्छुक वकील डॉक्टर इंजिनिअर शिक्षक-प्राध्यापक विज्ञान वाणिज्य व इतर सर्वच क्षेत्रातील नोकरी-व्यवसाय करणारे पदवीधर मुले मुली आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या मुला मुलीचे विवाह जुळण्यास येथे उपलब्ध होईल त्यासाठी प्रत्येकाने वधू-वर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या माध्यमातून आपल्याला योग्य ते वधु वर आपल्या आवडीनिवडी सार्थ स्थळ मिळेल अनेक उत्तम स्थळा पर्यंत पाहण्यासाठी विवाह जमविण्यासाठी आपल्या वधु वराचे नाव नोंदणी करण्यासाठी सुदर्शन बोराडे मोबाईल नंबर 7588818828 यांच्याशी संपर्क करून या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे, विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य संयोजक सुदर्शन बोराडे, दीलीप मतकर अमरावती, राजू आंबेकर नांदेड, नामदेव सुवर्णकार, मधुकर टोम्पे पुणे, प्राध्यापक अतुल काटकर परभणी, विजय पेनुरकर, बालाजी सुवर्णकार, राम रत्नपारखी, श्री हरी रत्नपारखे लातूर यांच्यासह इतर सर्व सन्माननीय सदस्यांनी केले आहे.
Previous Post Next Post