गौरकार कॉलनी येथे घरफोडी, चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीच्या वस्तूंवर केला हाथ साफ

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहर व तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट वाढला असून हे चोरटे बंद घरांना टार्गेट करू लागले आहेत. महाशिवरात्री निमित्त परिवारासह बाहेरगावी गेलेल्या गौरकार कॉलनी येथिल रहिवाशाच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तूंसह रोख रक्कमेवर हाथ साफ केल्याची घटना १ मार्च ते ३ मार्च दरम्यान घडली. कुटुंब प्रामुखाने आज ३ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 

गौरकार ले-आऊट, दत्त मंदिर मागे राहणाऱ्या कुंतलेश्वर नागोराव तुरविले (५६) यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुंतलेश्वर तुरविले हे खाजगी शिकवणी वर्ग घेतात. ते महाशिवरात्री निमित्त कुटुंबासह जळका ता. मारेगाव येथे गेले होते. घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेऊन असलेले रोख १२ हजार ८०० रुपये, २० ग्राम वजनाचा चांदीचा गडवा किंमत १०६० रुपये, चांदीचे १० ग्रामचे ३ व २० ग्रामचा एक सिक्का किंमत २५०० रुपये, असा एकूण १६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांच्या शेजारी राहणारे रोहित भुसारी यांनी त्यांना फोन करून तुमच्या घराचे दार खुले असल्याचे सांगितले. त्यांचा फोन येताच तुरविले यांनी घराकडे धाव घेतली. घरी पोहचताच त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पोलिस स्टेशनला येऊन घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करित आहे.
गौरकार कॉलनी येथे घरफोडी, चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीच्या वस्तूंवर केला हाथ साफ गौरकार कॉलनी येथे घरफोडी, चोरट्यांनी रोख रक्कमेसह चांदीच्या वस्तूंवर केला हाथ साफ Reviewed by सह्याद्री चौफेर on March 03, 2022 Rating: 5
Powered by Blogger.