सह्याद्री न्यूज नेटवर्क |
नेवासा : महाराष्ट्राचं हृदय क्षणभरासाठी थांबलं एवढं प्रेम सिंधू ताईंनी त्यांच्या समाज कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिलं. आज महाराष्ट्र राज्यातील सर्व अनाथांचे छत्र हरपले आहे मात्र, माई च्या पावलांवर पाऊल ठेऊन पुढे देखील आम्ही माईचे समाजकार्य सुरूच ठेऊ असे प्रतिपादन सामजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक यांनी केले.
माई च्या निधनानंतर पहिल्यांदा वर्धा येथील माई च्यां निवस्थानी भेट दिली या वेळी त्या बोलत होत्या
यावेळी ठक म्हणाल्या की संपूर्ण महाराष्ट्राची माई म्हणून जगप्रसिध्द असलेल्या सिंधू ताई सपकाळ ह्या मूळच्या वर्धा येथील. दर महिन्याला त्या त्यांच्या निवास्थानी येवून राहायच्या, त्यांना समाज कार्याची देवी म्हंटल तर वावंग ठरणार नाही. हजारो अनाथ लेकरांची माय म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ सिंधुताईंच्या जाण्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला पोरका झाला
माझ्या माईच्या कार्याला शत शत नमन ...
"समाज कार्यात स्वहता चं संपुर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या माई च्या जीवनातील क्षण कधीही न विसरता येणारें आहेत माईच्या निवास्थानी भेट दिली असता मनं सुन्न झाले आहे माईचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू "
मंगलाताई ठक (सामजिक कार्यकर्त्यां)
महाराष्ट्र राज्यातील अनाथांचे छत्र हरपले - सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई ठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 30, 2022
Rating:
