सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मारेगाव : मारेगाव पं स अंतर्गत येत असलेल्या वनोजा येथील गल्लोगल्लीत सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत,ग्रामसेवकाने यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, महामारी च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तरी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांची आहे.
तालुक्यातील वनोजा येथील गावात सांडपाणी गल्लोगल्ली रस्त्यावर वाहत असल्याने स्थानिक जेष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ठिकठिकाणी गड्यात घाण साचून रोगराई डोकं वर काढत आहे शिवाय सौंदर्यीकरण बिघडले असून गावाचे विद्रुपीकरण होताना दिसून येत असल्याचे चित्रे आहे. याबाबत ग्रामपंचायत ला अनेकदा मौखिक व लेखी निवेदन देण्यात आली मात्र, याची तिळमात्र दखल घेतली नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
गावाला पाणीपुरवठ्याची सुविधा आहे मात्र, सांडपाणी योग्य मार्गाने जाण्यासाठी नाली नसल्याने गावातील प्रमुख रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. यामुळे या वाहत्या सांडपाण्याने अनेकांना घसरून पडावे लागले आहे. गावात नाली व स्वच्छतेचे व्यवस्थापन नसल्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट योग्य मार्गाने होत नाही, परिणामी ग्रामपंचायतीने दुर्लक्ष न करता रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
वनोजा गावात घाणीचे साम्राज्य, ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 08, 2022
Rating:
