सुंदरनगर येथील डीएव्ही सीबीएसई स्कुल वणी येथे स्थलांतरित करावी, शिवसेनेचे राजू तुराणकर यांची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाची मान्यता प्राप्त असलेली डी. ए. व्ही. ही इंग्रजी माध्यमिक शाळा सुंदरनगर येथून वणीला स्थलांतरित करण्याची मागणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पालकमंत्री आज वणीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. डीएव्ही स्कुल वणी पासून अतिशय लांब असून निलजई कोळसाखाणी पासून अगदीच जवळ आहे. कोळसाखाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शाळेच्या इमारतीला तडे गेले असून धोकादायक स्थितीत ही इमारत आली आहे. ही शाळा वणीला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असतांनाच काही अधिकारी स्वतःच्या फायद्याकरिता ही शाळा घुग्गुसला हलविण्याचा प्रयत्नात आहेत. डीएव्ही ही इंग्रजी माध्यमिक शाळा वणी परिसरातील विद्यार्थ्यांकरिता असून येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळावं म्हणून या शाळेला वणी येथे स्थलांतरित करणे आवश्यक आहे. 
डीएव्ही या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये वणी परिसरातील ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. वणी परिसरातील वेकोलि कर्मचारी व कास्तकारांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाचं (सीबीएसई बोर्ड) शिक्षण घेता यावं म्हणून सुंदरनगर येथे ही शाळा सुरु करण्यात आली. ही शाळा वणी परिसरातील विद्यार्थ्यांना अतिशय लांब पडत असल्याने स्कुल बसचा मोठा खर्च पालकांना उचलावा लागत आहे. त्याचप्रमाणे कोळसाखाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे शाळेच्या ईमारतीला तडे गेले असून ईमारत धोकादायक स्थितीत आली आहे. ब्लास्टिंगच्या आवाजामुळे व हादऱ्यांमुळे शिकवणी वर्ग घेतानाही व्यत्यय येत असून विद्यार्थीही भीतीच्या सावटात वावरतात. त्यामुळे डीएव्ही स्कुल वणी येथे स्थलांतरित करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करावा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख राजू तुराणकर यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

निवेदन देतांना शिवसेनेचे संजय देरकर, दीपक कोकास, संतोष कुचनकर, अजिंक्य शेंडे, भगवान मोहिते, संजय देठे, प्रवीण खानझोडे, मो. असलम, डॉ. जुनगरी, प्रेमा धानोरकर, राजू वाघमारे, अनिल उलमाले, मंगल भोंगळे, जनार्धन थेटे, शंकर देरकर, बबन केळकर आदी उपस्थित होते.
सुंदरनगर येथील डीएव्ही सीबीएसई स्कुल वणी येथे स्थलांतरित करावी, शिवसेनेचे राजू तुराणकर यांची मागणी सुंदरनगर येथील डीएव्ही सीबीएसई स्कुल वणी येथे स्थलांतरित करावी, शिवसेनेचे राजू तुराणकर यांची मागणी  Reviewed by सह्याद्री चौफेर on January 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.