वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सचिव पदी वासीक जुबेर शेख यांची नियुक्ती

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख

यवतमाळ : सन २०११ पासुन नैतिक सिद्धांताच्या आधारावर स्थापित राजकीय पक्ष वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया या पक्षांनी आपला पक्ष विस्तारा करण्याकरिता संपूर्ण देशात जिल्हा,तालुका व गाव पातळीवर शाखा स्थापन करून पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती करण्याचे काम सुरू केले आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश विभागाच्यावतीने यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यातूनच यवतमाळ जिल्हा सचिवपदी व्यवसायिक, समाजसेवक आणि प्रसिद्ध पत्रकार तसेच विविध पत्रकार संघटनेशी जुळलेले वासीक जुबेर शेख यांची वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहमद खान यांचे नियुक्ती पत्रावरून नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर नियुक्तीचे कार्यक्रम वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय वेंकटेश सोसायटी भोसा रोड यवतमाळ येथे गुरुवार दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहमद खान यांच्या अध्यक्षतेखाली तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्ष मिर्झा अतवार बैग,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष निलेश त्रिपाठी आणि डॉ.अबरार अहमद खान यांचे सुपुत्र प्राध्यापक फुरकान अहमद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

आपल्या या नियुक्तीबद्दल वासीक जुबेर शेख यांनी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आकिब शेख,प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अबरार अहमद खान, प्रदेश सचिव आरिफ अंजुम खान तसेच यवतमाळ जिल्हाध्यक्ष मिर्झा अतवार बैग,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष निलेश त्रिपाठी यांचे आभार मानले तसेच सर्व मान्यवरांनी वासीक जुबेर शेख यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सचिव पदी वासीक जुबेर शेख यांची नियुक्ती वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सचिव पदी वासीक जुबेर शेख यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on December 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.