संत शिराेमणी श्री जगनाडे महाराज जन्माेत्सव व रक्तदान शिबीर संपन्न



सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : जिल्ह्यातील घुग्घूस येथे आज बुधवार दि.८ डिसेंबरला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विदर्भ तेली समाज महासंघ शाखा घूग्गुसच्या वतीने स्थानिक गांधी चाैकात सकाळी १० वाजता संत शिराेमणी श्री जगनाडे महाराज यांच्या जन्मोत्सव कार्यक्रम थाटात व उत्साहात पार पडला. या दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यांत आले हाेते. तदवतचं स्वर्गरथ लाेकार्पण साेहळ्याचे देखिल आयोजन या निमित्ताने करण्यांत आले हाेते. दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखिल तैलिक समाजा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यांत आले असल्याचे साेनल भरडकर यांनी या वेळी बाेलतांना सांगितले.

आजच्या रक्तदान शिबिरात हे वृत्त लिहीपर्यंत १०३ रक्तदात्यांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केल्याची माहिती घुग्घुसच्या महिला कार्यकर्त्या शुभांगी गारसे यांनी दिली. संध्याकाळी उशिरापर्यंत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुरु हाेता. उपरोक्त कार्यक्रमाला चंद्रपूर येथील सुपरिचीत डॉ.विश्वास झाडे प्रामुख्याने उपस्थित हाेते.

कार्यक्रम यशस्वी करण्यांसाठी दिनेश बाेरपे, रुकेश समर्थ , मयूर झाडे , तसेच समाज महासंघ शाखा घूग्घुसचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Previous Post Next Post