सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब : कळंब येथे तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतुन जागतिक पेटेंट प्राप्त झाले आहे .
या बाबत सविस्तर वृत्त असे की कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत मुरलिधरराव डेहनकर यांच्या सारथी या नवीन उपकरणाला नुकतेच जर्मनी मधून पेटेंट प्राप्त झालेले आहे.
गेल्या 28 वर्षांपासून पेट्रोलियम आणि गॅस व्यवसायिक असलेले कळंब येथील उद्योजक श्री प्रशांत डेहनकर यांचे या व्यवसायामध्ये येणाऱ्या अडीअडचणी व गरजा या करीता अविरत संशोधन कार्य सुरू असते.
गेल्या जवळपास बारा वर्षां पासून त्यांनी अनेक उपकरणे या दरम्यान विकसित केली व इंडियन ऑईल कार्पोरेशनची मान्यता मिळवून त्या उपकरणांना संपूर्ण देशात त्यांच्या ए टू झेड इंजीनियरिंग च्या माध्यमातून वितरीत केले.
अलीकडेच त्यांनी तयार केलेले "सारथी" नावाचे नवीन उपकरण त्यांच्या या व्यवसायात अतिशय उपयोगी ठरणारे आहे ज्याच्या माध्यमाने एकावेळी दोन सिलेंडरची हाताळणी व गोडाऊन किंवा गॅस बॉटलिंग प्लांट मध्ये विना प्रयासाने सहज शक्य आहे .
या उपकरणामुळे गॅस गोडाऊन मध्ये सिलेंडरची होणारी ने आन अतिशय सोपी झालेली असून पर्यायाने होणारी आदळ आपट सुद्धा बंद होईल व सिलेंडरचे आयुर्मान वाढण्यास मदत होईल त्यामुळे कंपनीचे सिलेंडर दुरुस्ती वर होणाऱ्या भल्यामोठ्या खर्चाची बचत होईल.
या उपकरणाची गरज गॅस बॉटलिंग प्लांट व एलपीजी वितरकांचे गॅस गोडाऊन या ठिकाणी असेल.
याचे यशस्वी प्रात्यक्षिक इंडियन ऑईल कार्पोरेशन च्या धनज जिल्हा वाशिम या बॉटलिंग प्लांट मध्ये नुकतेच पार पडले.
आणि याचा उपयोग महाराष्ट्रा मधील इंडियन ऑईल कार्पोरेशन च्या सर्वच बॉटलिंग प्लांट व काही वितरकांच्या गोडाउन मध्ये सुरू झालेला असून याबाबतीत तेथील कामगार व कर्मचारी अतिशय आनंदी आहे.
जगात टेक्नॉलॉजी च्या बाबतीत अग्रगण्य असणाऱ्या जर्मनी सारख्या प्रगत देशा मधूनच जागतिक पेटेंट या उपकरणाला मिळालेले असल्या मुळे यवतमाळ जिल्ह्या करिता हा मोठा बहुमान आहे. फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी , जर्मन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिस चे मुख्य कार्याध्यक्ष कॉर्नेलिया रुडलोफ शोफर यांचे कडून हे पेटंट मंजूर झाले असून या बाबतीत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय ते त्यांचे वडील श्री मुरलीधरराव डेहनकर यांना देतात कारण वडील सुद्धा संशोधक वृत्तीचे असून त्यांनी कृषी क्षेत्रात अनेक नवनवे प्रयोग केल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
एकाच वेळी दोन सिलेंडर वाहून नेणाऱ्या "सारथी" उपकरणा साठी त्यांना इंडियन ऑईल कार्पोरेशन चे विक्रय अधिकारी श्री. निलेश ठाकरे, व मुख्य क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. अनिल मेहेर नागपूर यांचे मार्गदर्शन लाभले आहे असे त्यांनी नमूद केले.
अभियंता असलेले उद्योजक श्री प्रशांत डेहनकर हे पर्यावरण प्रेमी सुद्धा आहे ज्यांनी आतापर्यंत कळंब च्या आजूबाजूला हजारो वृक्षांची लागवड स्वखर्चाने करून त्यांचे संगोपनाचे कार्य सुद्धा अविरत सुरू असते.
पर्यावरणाच्या या कार्या सोबत प्रशांत हे उत्कृष्ट गायक व अभिनेता सुद्धा आहे ज्यांचे देशात अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले असून आतापर्यंत इंडियन ऑईल कार्पोरेशन करिता स्वरचित एज्युकेशनल व मोटिवेशनल दहा ते बारा शॉर्ट फिल्म स्वतः अभिनय करून तयार केलेल्या आहे.
सध्या सारथी या उपकरणाची निर्मिती सुरू असून लवकरच देशभरातील गॅस व्यवसायिकांच्या एलपीजी गोडाऊन वर व बॉटलींग प्लांट वर याचा उपयोग सुरू होईल अशी माहिती प्रशांत मुरलीधरराव डेहनकर. कळंब यांनी आमचे प्रतिनिधी रूस्तम शेख यांना दिली.
"कळंब मध्ये तयार झालेल्या उपकरणाला थेट जर्मनीतून जागतिक पेटेंट प्राप्त"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 30, 2021
Rating:
