सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : स्थानिक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे संत गाडगे बाबा ची पुण्यतिथी महाविद्यालय परिसर स्वच्छता करून राबविण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे अधीक्षक रवींद्र धानोरकर यांनी संत गाडगे बाबाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच डॉ. गजानन सोडणर यांनी संत गाडगे बाबाच्या गावोगावी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेवर प्रकाश टाकण्यात आला.
सदर उपक्रमास यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सर व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेतला. यावेळेस बहुतांश विद्यार्थ्यांनी व शिक्षक, शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेच्या माध्यमातून तालुक्यात संदेश पोहचवून आपला सहभाग नोंदविला.
रा.से.यो विभागातर्फे संत गाडगे बाबा पुण्यतिथी स्वच्छता अभियान राबवून साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 27, 2021
Rating:
