टॉप बातम्या

प्रणालीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भव्य स्वागत

सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : पर्यावरण प्रेमी कु.प्रणाली चिकटे ही महाराष्ट्र भ्रमती करून तब्बल चौदा महिन्याच्या १४ हजार किलोमीटर चा प्रवास करून स्वगृही तालुक्यात प्रवेश करत आहेत.

वेळी तिचे मारेगांवच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तिचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी कु.प्रणाली चिकटे यांनी जागतिक पर्यावरण समस्येवर प्रकाश टाकला आणि पर्यावरण वाचवने किती महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी तसेच सर्व महाविद्यालय प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच वणीतील स्माईल फाऊंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post