सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात विस्तारीत असून तालुका व शहर कार्यकारिणी गठीत करण्यात येत आहेत. त्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात मोठे शहर म्हणून बल्लारपूर शहराची ओळख आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ऑल इंडिया पँथर सेनेच्या न्यायपुर्ण व आंदोलक भूमिकेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांना ऑयडाल माननारा वर्ग मोठ्या प्रमाणावर पँथर सेनेत दाखल होण्यास इच्छुक आहेत. त्याच निमित्ताने बल्लारपूर शहरात सुद्धा शहर कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात शहर अध्यक्ष म्हणून प्रशांत गडल्ला तर महिला शहर अध्यक्ष म्हणून सरीता गुज्जर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या शिवाय शहर महासचिव म्हणून बबीता बहुरीया, उपाध्यक्ष निता उद्रके, सचिव मनिषा गुज्जर, संघटक संतोषी कैथवास आदीची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यकारीणी बैठकीत उपस्थित जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संतोष डांगे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागी भाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा मार्गदर्शक भैय्याजी मानकर आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात ऑल इंडिया पँथर सेनेचे संघर्ष नायक दिपकभाई केदार सातत्याने न्याय हक्कासाठी लढत आहेत. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले संघर्ष करीत आहेत. यांच्या कार्याची दखल घेत चंद्रपूर जिल्ह्यात मोठा झंझावात निर्माण झालाय, जिल्हा पँथरमय होण्याच्या मार्गावर आहे. गाव तिथे पँथर, तालुका तिथे पँथर निर्माण होत आहेत. संघर्षनायक दिपकभाई केदार यांचे हात मजबूत करण्यासाठी पँथर ताकदीने उभी होत आहे. ज्या ज्या वेळेस जिल्ह्यात अन्याय अत्याचार होतील त्या त्या वेळेस पँथर भूमिका घेणार असे मत जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी व्यक्त केले. पँथरची भुमिका जिल्हा सल्लागार संतोष डांगे यांनी यांनी उपस्थीतांना सांगितली.
बल्लारपूर शहर कार्यकारीणीत निशा भिमनवार, बुलबुल बोरकर, करीश्मा वाढई, गिता मांदाळे, सुभद्रा बहुरीया, सुमन कैथवास, मनिषा गुज्जर, शबनम शेख, ज्योती बहुरीया, नितेश बहुरीया, जतीन गुज्जर, नितेश बहुरीया, आकाश बहुरीया, तन्मय खांडस्कर, आयुष तुपे आदींचा समावेश आहे. .
ऑल इंडिया पँथर सेना बल्लारपूर शहरची कार्यकारिणी गठीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 20, 2021
Rating:
