सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव : दिवाळी सणाचे औचित्य साधुन दि.४/११/२०२१ रोजी ग्रामपंचायत पिरंजी ता. उमरखेड च्या वतीने माहेरभेटीचा सोहळा आयोजीत केला. पिरंजी ग्रामपंचायत अंतर्गत ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला अशा महिलांना साडी चोळी भेट देऊन लक्ष्मीपूजन च्या दिवशी खऱ्या लक्ष्मीचे पूजन अर्थात नव्या मुलीच्या जन्माचे स्वागत करून माहेरभेट कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी या शुभप्रसंगी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण काळे, प्रमुख पाहुणे सुनील जाधव सर, शंकर सुळ उपसरपंच, विजय नखाते मारुती मुरमुरे, संजय आडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई गणेशराव लोखंडे, वंदना संजय खूपसे, संतोष संभाजी भवाळ,देवानंद पाईकराव, कृष्णा लोखंडे,देवानंद रोकडे, सुनील मुरमुरे, सचिन वाहुळे, गंगाराम दवणे, महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक युवक मंडळ व समस्त गावकरी मंडळ उपस्थित होते.
ग्रामपंचायत पिरंजी च्या वतीने माहेरभेटीचा आयोजीत सोहळा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 05, 2021
Rating:
