घरफाेडीतील आराेपी चंद्रपूर पाेलिसांच्या ताब्यात


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : शहरातील एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह बाहेर गावी गेला हाेता. त्या घरी आता कुणीच नाही ही नेमकी संधी साधुन चंद्रपूरातील फुकट नगर, राजीव गांधी नगर परिसरातील एका विधी संघर्षग्रस्त बालकाने घराचे कुलुप ताेडुन आलमारीत ठेवले साेन्या चांदीचे दागिणे लंपास केले हाेते. त्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत अंदाजे १,४४,००० रुपयांची हाेती. गुन्हे शाखेतील पाेलिस अधिकारी व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेवून या घटनेतील संशियत बालकास शाेधले नंतर त्याला विश्वासात घेवून त्याची सखाेल चाैकशी केली असता त्याचे कडुन (साेन्या चांदीचे) अंदाजे १,३८,५००रुपये किंमतीचा मुद्देमाल काल हस्तगत केला. तक्रारदार याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रामनगर पाेलिसांनी अप.क्र. ११३६ /२०२१ कलम ४५४, ४५७, ३८० भांदवि अन्वये गुन्हा नाेंद केला आहे.
उपराेक्त कारवाई चंद्रपूरचे पाेलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पाेलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पाेलिस अधिकारी नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पाेलिस स्टेशनचे सपाेनि संदीप धाेबे, सपाेनि हर्षल एकरे, पाेउनि.विनोद भुरले, पाेलिस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार नापाेशी पुरुषोत्तम चिकाटे,विनाेद यादव, पेतरस शिडाम, संजय चौधरी, किशाेर वैरागडे, आनंद खरात, पांडुरंग वाघाेडे, निलेश मुडे, सतीश अवथरे, पाेशी लालू यादव, विकास जुमनाके, माजिद पठाण व हीरालाल गुप्ता या पाेलिस कर्मचा-यांनी केली आहे.
घरफाेडीतील आराेपी चंद्रपूर पाेलिसांच्या ताब्यात घरफाेडीतील आराेपी चंद्रपूर पाेलिसांच्या ताब्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on November 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.