सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : राज्य शासनात विलिगिकरण करण्यात यावे, या मागणीला घेऊन मागील काही दिवसांपासुन राज्यभरात एसटी कर्मचारयांचे आंदोलन सुरु आहे. वणी येथेही कर्मचारयांचे बसस्थानक परिसरात आंदोलन सुरु असून शासनाने कर्मचारयांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने व वरिष्ठ अधिकार्यांनी सेवेवर रुजू न झाल्यास निलंबनाचा इशारा दिल्याने मानसिक तणावात आलेल्या आंदोलनकर्त्या एका चालक वाहकाचा आज अचानक मृत्यु झाला. वणी एसटी डेपोत चालक वाहक म्हणून कार्यरत असलेल्या व या विलिगिकरणच्या लढ्यात सहभागी असलेल्या येथिल बस चालक वाहकाचा आज अचानक मृत्यु झाला. दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी त्याचा मृत्यु झाल्याने आंदोलकांमध्ये तिव्र असंतोष खदखदत असून परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. चंदू मडावी वय अंदाजे 45 वर्षे असे या मृत्यु पावलेल्या चालक वाहकाचे नाव आहे. काही दिवसांपुर्वी अहमदनगर जिल्ह्यातील चालक वाहकाने एसटी महामंडळाच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात एसटी बसला गळफास लाऊन आत्महत्या केली होती.
एसटी महामंडळाने नेहमीच कर्मचारयांवर अन्याय केला. त्यांचे वेतनवाढ करण्यापासुन तर महागाई भत्त्यांसाठी नेहमी आंदोलन सुरु असते. त्यांना मागील काही काळात वेळेवर वेतन सुद्धा मिळाले नाही. शासनाने नेहमी या कर्मचारयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. एसटी कर्मचारयांवर वेतना अभावी उपासमारिची वेळ आली. कित्येक वर्ष लोटले तरी त्यांचे राज्य शासनात विलिगिकरण करण्यात आले नाही. एसटी महामंडळात सेवेची हमी नाही, वेतन वेळेवर मिळत नाही, नोकरी करुनही जिवन जगण्याचे वांदे, त्यामूळे एसटी महामंडळाचे चालक, वाहक व कर्मचारी नेहमी नैराश्येतच असतात. याच कारणाने त्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिगिकरण करण्याची मागणी रेटून धरली. या मागणीला घेऊन मागील काही दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरु आहे. परंतू वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर सेवेत रुजू होण्याकरिता दबाव आणत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. सेवेत रुजू व्हा, नाही तर निलंबित करण्यात येईल अशी तंबी वरिष्ठांकडुन मिळत असल्याने नैराश्येत आलेल्या चंदू मडावी या आंदोलक चालक वाहकाचा मानसिक तणावात येऊन आज अचानक मृत्यु झाला असल्याचे बोलल्या जात आहे. त्याच्या मृत्युमुळे संपुर्ण कुटुंब चव्हाट्यावर आलं आहे. त्यांच्या सहकारी आंदोलनकर्त्यांमध्ये तिव्र असंतोष खदखदत असून त्याचा नैराश्येतून झालेला मृत्यु अनेकांच्या मनाला चटका लाऊन गेली आहे. एकिकडे संपुर्ण तालुका दिवाळी साजरी करित असतांना दुसरीकडे नैरश्येच्या आलेल्या वादळाने एक दिप विजला आहे.
राज्य शासनात विलिगिकरण करण्याच्या सुरु असलेल्या आंदोलनातील एका आंदोलनकर्त्याचा मृत्यु
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 04, 2021
Rating:
