सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : भारतीय सणातील सर्वात माेठा सण दिवाळी ! याच सणातील महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपुजन ! गत वर्षी भयावह काेराेनामुळे बाजार पेठेतील बहुतेक सर्वच व्यवहार ठप्प पडले हाेते. परंतु या वर्षी मात्र चंद्रपूरची बाजारपेठ अक्षरशा गर्दीने फुलली असल्याचे दिसून येवू लागले आहे . मागील महिण्यांपासून महिलांची बाजारपेठेत खरेदी सुरु झाली असून विविध वस्तुने बाजारपेठ सजली आहे. विशेषता शहरातील गाेलबाजार सकाळ पासून तर रात्री उशिरा पर्यंत ग्राहकांच्या गर्दीने फुलुन दिसते.
महागाई जरी वाढली असली तरी ग्राहकांचा दिवाळीतील उत्साह या वर्षी मात्र, कायम असल्याचे एकंदरीत दिसून येते. भाजी बाजारातील हिरव्या भाज्यांचे भाव कडाडले असुन दिपावलीत घराला लावण्यांत येणां-या आकाश दिव्यांचे भाव देखिल या वर्षी आकाशाला भिडले आहे. तर, फटाक्यांच्या किंमतीतही बरीच वाढ झाली आहे. सराफा लाईन व कापड व्यापा-यांचा या दिवाळीत व्यवसाय चांगलाच वाढु लागला आहे. त्या ही दुकाणांत खरेदी दारांची गर्दी वाढु लागली आहे. बरेच जण काेराेना संपला या भावनेत वागु लागले आहे. अनेक व्यापा-यांसह ग्राहक विना मास्कने बाजार पेठेत दिसू लागले आहे.
चंद्रपूर बाजारपेठ गर्दीने फुलली; अनेक ग्राहक मास्क विना खरेदीसाठी बाजारात येवू लागले !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 04, 2021
Rating:
