तिवसा तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

अमरावती : विधी प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व तालुका सेवा विधी सेवा तिवसा व तालुका वकील संघ तिवसा यांच्या संयुक्त विद्यमाने 'आझादी महोत्सव' अंतर्गत कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम नुकती तिवसा तहसील कार्यालय शांततेत पार पडली. 
तालुका विधी सेवा प्राधिकरण तर्फे मागील महिन्यांपासून तिवसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजादी का अमृत महोत्सव या शिर्षकाखाली सर्वसामान्य जनतेला कायद्याचे महत्त्व पटावे तसेच त्यांच्या मनातील कायद्याची भीती निघावी यासाठी कायदे विषयक शिबीर आयोजित करण्यात आले यामध्ये वकील मंडळींनी आपल्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना करून दिला.
अनेक आबालवृद्धांना तसेच स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यात आली विशेष करून हा कार्यक्रम समाजातील तळागळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणून कायद्याचे ज्ञान त्यांना देण्यात आले. त्याचबरोबर नालसा तर्फे सुचित करण्यात आलेल्या कायदेशीर उपाय योजनेबाबत लोकांना माहिती देऊन गरजू लोकांना मोफत कायदेशीर सहाय्य कसे घ्यावे? तसेच त्याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया ही सर्वसामान्य भाषेत लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
या कार्यक्रम तिवसा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तालुका विधी सेवा अध्यक्ष लिलाधर कोरडे यांनी 'महाराष्ट्र जमीन नियम १९६६' सल्ला दिला, राईट ऑफ रेकॉर्ड, वारस कायदा अश्या महत्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

तसेच चांदुर रेल्वे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शिवाजी देशमुख यांनी 'अघोरी विद्या प्रतिबंधक कायदा' विषयवर मार्गदर्शन केले. तिवसा वकील संघाचे सचिव ॲड. पी. डी. राजनेकर यांनी प्रास्ताविक भाषण केले. ॲड. प्रियंता राजनेकर यांनी वारस कायदेविषयक मार्गदर्शन केले. पदाधिकारी कार्यक्रमाला तहसीलदार वैभव फरतारे, तालुका वकील संघ
तिवसा तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती तिवसा तहसील कार्यालयात कायदेविषयक जनजागृती Reviewed by सह्याद्री चौफेर on November 16, 2021 Rating: 5
Powered by Blogger.