सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती बडगे यांचा सत्कार निरोप समारंभ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : अनेक वर्षे नौकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृती. शासनाच्या विविध कालमर्यादा नुसार श्रीमती ज्योती बडगे (शिरभये) मॅडम सेवानिवृत्त झाल्या आहे.

मॅडमनी 1988 मध्ये पवित्र शिक्षण सेवा कार्याला शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वणी जिल्हा यवतमाळ येथून सुरुवात केली आणि आज त्यांच्या शासकीय अध्यापन सेवा कार्याला पूर्णविराम मिळाला आहे. एकूण 33 वर्ष वर्षाची दीर्घ सेवा करून आदरणीय बडगे (शिरभये) मॅडम आज दिनांक 30 नोव्हेंबर 2021 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री क्षिरसागर सर व उपमुख्याध्यापक मा. श्री तामगाडगे सर यांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

शांत सुस्वभावी असा त्यांचा मनमिळावू स्वभाव असलेल्या संस्कृत या विषयांचे त्या अध्यापन करीत होत्या. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती बडगे यांचा सत्कार निरोप समारंभ सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती बडगे यांचा सत्कार निरोप समारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on November 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.