सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : विविध याेजना अंतर्गत शासन गावांच्या विकास कामांसाठी दर वर्षी लाखाें रुपये ग्राम पंचायतींना देत असते. परंतु मूल तालूक्यातील अश्याच एका माेठ्या ग्राम पंचायतचे सरपंच व ग्राम सेवक यांनी एका जनसुविधा याेजनेच्या निधीत २२ लाख ४ हजार रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार नांदगावच्या विद्यमान सरपंचा हिमानी वाकुडकर यांनी मूल पाेलिस स्टेशनला करुन त्यांनी या बाबतीत रितसर चाैकशीची मागणी केली आहे. इतकेच नाही तर या तक्रारीच्या प्रति जिल्हा परिषद सिईआे तथा पंचायत समितीचे बिडीआे यांचेकडे देखिल सादर केल्या असल्याचे समजते. दरम्यान,या प्रकरणात वरिष्ठांकडे तक्रारी सादर हाेताच नांदगांवचे माजी सरपंच मंगेश मनगुरवार व सचिव उत्तम बावनथडे हे गेल्या एन महिण्यांपासून बेपत्ता असल्याची गावभर चर्चा सुरु आहे. मूल पाेलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, पाेलिस कर्मचारी त्यांचा शाेध घेत आहे हे वृत्त लिहीपर्यंत ते पाेलिसांना गवसले नव्हते. जनसुविधा याेजनेत गैरव्यवहार, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रेकॉर्ड गहाळ करणे, मिळालेल्या निधीचा गैरव्यवहार व अफरा तफर करणे आदीं आराेप त्यांचेवर करण्यांत आले असून या पूर्वि याच प्रकरणाच्या अनुषंगाने सचिव बावनथडे निलंबित झाले हाेते. माजी सरपंच व सचिव या दाेघांनी मिळून या ग्राम पंचायतीत हा गैरव्यवहार केला आहे.
या प्रकरणात तातडीने कारवाई करावी या साठी नांदगांवच्या सरपंचा हिमानी वाकुडकर यांनी सातत्याने वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरु ठेवलेला आहे. परंतु अद्याप त्यांचेवर ठाेस अशी कारवाई झाली नाही.
नांदगाव ग्रा.प.मध्ये झाला लाखाें रुपयांचा गैरव्यवहार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 22, 2021
Rating:
