सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२५ ऑक्टो.) : शहरातील खडबडा मोहल्ला येथे गोवंश जनावरांच्या तस्करीची प्रकरणं सातत्याने समोर येतांना दिसत आहे. कत्तली करिता गोवंश जनावरांची तस्करी केल्या जात असल्याची अनेक प्रकरणं याआधीही पोलिसांनी उघड केली आहे. खडबडा मोहल्ला हा गोवंश जनावरांच्या तस्करीचा अड्डा बनू लागला आहे. गोवंश जनावरांची अवैधरित्या खरेदी करून त्यांची कत्तली करिता विक्री केली जाते. खडबडा मोहल्ला येथे गोवंश जनावरांच्या तस्करीचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. कत्तली करिता गोवंश जनावरांची तस्करी करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. मालवाहू वाहनात गोवंश जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तल करण्याकरिता घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाला पोलिसांनी ताब्यात घेऊन ७ गोवंश जनावरांची त्यांच्या तावडीतून मुक्तता केली आहे. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारे मालवाहू वाहन तर पोलिसांनी ताब्यात घेतले, पण वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. सपोनि माया चाटसे यांना खडबडा मोहल्ला येथून गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. अवैधपणे गोवंश जनावरांची खरेदी करून त्यांना मालवाहू वाहनातून कत्तलखाण्यात पाठविले जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी जत्रा मैदान प्रेमनगर येथे सापळा रचून खडबडा मोहल्ला रंगनाथ नगर कडून येणारे मालवाहू वाहन थांबविले. चालकाने वाहन तर थांबविले पण वाहन सोडून पळ काढला. तसेच दुचाकीने त्याच्या मागे येणारे त्याचे दोन साथीदारही दुचाकी सोडून पळाले. पोलिसांना मालवाहू वाहनात ७ गोवंश जनावरे अतिशय निर्दयीपणे कोंबून असल्याचे आढळून आले. गोवंश जनावरांना कत्तली करिता घेऊन जाण्याचे आरोपींचे प्रयत्न पोलिसांनी उधळून लावले. घटना स्थळावरून पोलिसांनी ७ गोवंश जनावरे किंमत ४२ हजार रुपये, मालवाहू वाहन किंमत MH २९ OT ०२८५ किंमत १ लाख ८० हजार, दुचाकी MH २९ BL ६३१४ किंमत ७५ हजार रुपये असा एकूण २ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटना स्थळावरून फरार झालेल्या आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. त्यांच्यावर विविध कालमानांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सादर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथक प्रमुख माया चाटसे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
गोवंश जनावरांच्या तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी उधळला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 25, 2021
Rating:
