औद्योगिक पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून बंद असलेली अप्रेंटिस त्वरीत सुरू करा - राजु झोडे यांची मागणी
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (११ ऑक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजीनियरिंग करून आहेत. अशा विद्यार्थ्यांना औद्योगिक पदप्राप्त पदविका (अप्रेंटिस) करिता मागील दोन वर्षापासून संधी मिळत नसल्याने अप्रेंटिस पासून वंचित विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अप्रेंटिस सुरू करण्याबाबत मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात हजारो विद्यार्थी आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पास झालेले आहेत. परंतु मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व कंपन्यांमध्ये अप्रेंटिस ट्रेनिंग बंद आहेत.
कोरोना महामारी मुळे सर्व विद्यार्थी विवंचनेत सापडलेले असताना सरकारने बऱ्याच गोष्टींना शिथीलता दिलेले आहे. सर्व सुरळीत असताना अप्रेंटिस ट्रेनिंग का बंद ठेवली आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे. जोपर्यंत अप्रेंटिस पूर्ण होत नाही तोपर्यंत नोकरीच्या पदासाठी परिपूर्ण समजले जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड नुकसान होत असून लवकरात लवकर प्रशासनाने अप्रेंटिसची सुविधा करून देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजु झोडे यांनी केली.
सदरहु विषयावर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी याकरिता एक निवेदन दिले. निवेदन देताना वंचितचे नेते राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, नितीन जीवने, नवीन काळवला व जॉकीर खान उपस्थित होते.
औद्योगिक पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षापासून बंद असलेली अप्रेंटिस त्वरीत सुरू करा - राजु झोडे यांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 11, 2021
Rating:
