काँग्रेसचे दिग्गज नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात शहरासह चंद्रपूर जिल्हा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (११ ऑक्टो.) : केंद्र सरकारने कृषी विरोधी तीन कायदे पारीत करून शेतक-यांच्या न्याय हक्कावर गदा आणल्यामुळे मागील एक वर्षापासून शेतकरी आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करीत आहे व या आंदोलनाला दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार तथा उत्तर प्रदेश सरकार दडपशाही मार्गाचे अवलंब करीत आहे.

३ ऑक्टोंबर, २०११ रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथील आंदोलनकर्त्या शेतक-यांच्या जमावावर केंद्रीय गृह मंत्रीच्या मुलाने भरधाव चारचाकी गाडी चालवून आठ लोकांचा बळी घेतला. या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी पिडीतांच्या भेटीस निघालेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंकाजी गांधी यांना रस्त्यात अडवून त्यांचेशी गैरवर्तन करून प्रियंकाजींना कैदेत डांबून ठेवले.

लोकशाहीची हत्या करून हिटलरशाहीच्या पध्दतीने क्रूर अत्याचार करणा-या केंद्र सरकारच्या विरोधात आज सोमवार दिनांक ११ ऑक्टोंबर, २०२१ रोजी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी "महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले हाेते. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व काँग्रेस प्रेमी जनतेंनी प्रांताध्यक्षाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपूर जिल्हयातील कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा व शहर बंदला जनतेनी व व्यापा-यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. इतकेच नाहीतर आजच्या बंद मध्ये जनतेनी, शेतक-यांनी व व्यापारी बंधूंनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फुर्तीने बंद करून शेतक-यांप्रती सन्मान व्यक्त केला. तदवतचं
आज दिनांक ११ ऑक्टोंबरला दुपारी शेकडो कार्यकर्ते टू-व्हीलर्स (दुचाकी) वर केंद्र सरकारच्या शेतक-यांच्या अन्यायकारक धोरणा विरोधात काळे झेंडे लावून निदर्शने केलेत. जिल्हयात अनेक ठिकाणी उग्र प्रदर्शन करून बंद ठेवण्यात आले. तसेच चंद्रपूर येथे सकाळी ११.०० वाजता शेकडो कार्यकर्त्यांनी दुचाकीवर काळे झेंडे लावून व हातात घोषणा-फलक घेऊन नारेबाजी करीत गांधी चौकातून रैली काढली. शेकडो कार्यकर्त्यांची दूसरी रैली दुपारी एक वाजता निघाली संपूर्ण चंद्रपूरातील लहान-मोठया व्यापा-यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून १०० टक्के बंदला प्रतिसाद दिला. तसेच CPM सेक्रेटरी कॉ. वामन बुटले व CITU अध्यक्ष कॉ. प्रल्हाद वाघमारे शेकडो कार्यकर्त्यांसह सहभागी झाले.
सदरहु आंदोलन यशस्वी करण्यासाठी युवानेता राहूलबाबू पुगलिया, चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष करणबाबू पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हा (ग्रामिण) अध्यक्ष गजानन गावंडे, महासचिव अॅड.अविनाश ठावरी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेंद्र बेले, नगरसेवक अशोक नागापूरे, अॅड विजय मोगरे, चंद्रपूर जिल्हा NSUI अध्यक्ष स्वप्नील तिवारी, चंद्रपूर जिल्हा इंटक अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, देवेंद्र गहलोत, माजी जिल्हा परीषद सदस्य रामभाऊ टोंगे, अजय मानवटकर, विरेंद्र आर्य, रामदास वाग्दरकर, क्रिष्णन नायर, माजी नगरसेवक नासीर खान, माजी जिल्हा परीषद सदस्य अविनाश जाधव, बल्लारपूर युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन गेडाम, अनील तुंगीडवार, गजानन दिवसे, सुभाष माथनकर, माजी नगरसेवक महेंद्र जयस्वाल, माजी नगरसेवक विनोद पिंपळशेंडे, सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, अमोल हलदर निताई घोष, क्रिष्णा यादव, सुनिल बकाली, दुर्गेश चौबे, पृथ्वी जंगम आदींनी अथक परिश्रम घेतले.
काँग्रेसचे दिग्गज नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात शहरासह चंद्रपूर जिल्हा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद काँग्रेसचे दिग्गज नेते नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात शहरासह चंद्रपूर जिल्हा बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on October 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.