बेमुदत उपोषण: जामणी नाल्यावर उंच पुल बांधण्यात यावे

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (२७ ऑक्टो.) : झरी ते घोन्सा मार्गावरील जामणी गावाजवळील पुल सिमेंट पाईप चा व अतिशय छोटा आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेला कचरा, लाकडे त्याला अडकून पाईप जाम होतात. त्याच प्रमाणे त्या पुलाची उंची कमी आहे ती वाढविण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष समीर लेनगुळे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

पावसाळ्याच्या दिवसात या पुलावरून लवकरच पाणी वाहते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो. थोडा पाऊस आला तरी या पुलावरुन पाणी वाहते आणि या मार्गावरील वाहतूक बंद पडते. त्यामुळे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना पुराच्या पाण्याची पातळी कमी होईस्तोवर ताटकळत उभे राहावे लागते.
बेमुदत उपोषण: जामणी नाल्यावर उंच पुल बांधण्यात यावे बेमुदत उपोषण: जामणी नाल्यावर उंच पुल बांधण्यात यावे Reviewed by सह्याद्री चौफेर on October 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.