चिमूर : पं.स.सदस्या भावना बावनकर यांच्या पंधरावा वित्त आयोग १० टक्के निधीतुन दोन वाटर पंप टाकीचे लोकार्पण !
सह्याद्री न्यूज | रामचंद्र कामडी
चिमूर, (१७ ऑक्टो.) : चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत बोडधा येथे आंबेडकर वार्ड व गुरुदेव वार्ड येथे भावनाताई बावनकर यांचा पंधरावा वित्त आयोग (१० टक्के) निधी सन-२०२०-२१ अंतर्गत विहिरीवर इलेक्ट्रॉनिक पंप बसवून पाणी पुरवठा करणे हे काम पूर्ण झाले असून त्या कामाचे लोकार्पण व हनुमान मंदिर परिसर येथे डॉ.सतिश वारजूकर यांच्या पंधरावा वीत्त आयोग निधीतून बोरवेल टाकीचे भूमिपूजन काल दि.१६.१०.२०२१ ला चिमूर विधानसभा क्षेत्राचे सन्मव्यक तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतिश वारजूकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी, पंचायत समिती उपसभापती रोषण ढोक, पंचायत समिती सदस्या भावनाताई बावनकर, ग्राम पंचायत सरपंच रोशनी बारसागडे उपसरपंच सदाशिव घोनमोडे, तालुका कांग्रेस कमिटी चिमूरचे कोषाध्यक्ष प्रभाकर मेश्राम, ग्राम पंचायत सदस्य, हर्षाली बोरकर ग्राम पंचायत सद्स्य निर्मला कुंभरे, रोजगार सेवक देविदास दहीवले, शामरावजी घोनमोडे, विजयजी बोरकर व गावकरी मंडळी उपस्थित होती.
चिमूर : पं.स.सदस्या भावना बावनकर यांच्या पंधरावा वित्त आयोग १० टक्के निधीतुन दोन वाटर पंप टाकीचे लोकार्पण !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 17, 2021
Rating:
