ट्रायबल फोरम अमरावती विभागीय अध्यक्षपदी रितेश परचाके


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१२ ऑक्टो.) : आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले पांढरकवडा पंचायत समितीचे माजी सभापती, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रितेश परचाके यांची ट्रायबल फोरम अमरावती विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे.

ट्रायबल फोरम हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे. वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कॅडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे अमरावती विभागात आनंद व्यक्त केला जात आहे.

ते आपल्या निवडीचे श्रेय सेवानिवृत्त केंद्रीय सनदी अधिकारी एकनाथ भोये,ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्याध्यक्ष मिनाक्षीताई वेट्टी, जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे,जिल्हा महासचिव दीपक करचाल,वुमेन्स फोरमच्या जिल्हाध्यक्ष सिमा मंगाम यांना देतात.
ट्रायबल फोरम अमरावती विभागीय अध्यक्षपदी रितेश परचाके ट्रायबल फोरम अमरावती विभागीय अध्यक्षपदी रितेश परचाके Reviewed by सह्याद्री चौफेर on October 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.