सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (९ ऑक्टो.) : ४७ महाराष्ट्र बटालियन यवतमाळचे संयुक्त वार्षिक शिबिरांचे आयोजन श्री. बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडा दि. ५ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर २०२१ ला करण्यात आली आहे. दि.५ ऑक्टोबरला सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला असून कॅम्प कमांडर कर्नल व्यंकटरमन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी येत्या सात दिवसात कोणते प्रशिक्षण देण्यात येईल.ते बी आणि सी प्रमाणपत्रासाठी कसे महत्त्वाचे आहे. कोरोना काळात कशी दक्षता घ्यावी, शिबिरांची शिस्त व अनुशासन कसे असावे, आरोग्याची व स्वच्छतेची दक्षता कशी घ्यावी या विषयावर प्रकाश टाकला.
सदर शिबिरामध्ये ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण,मॅप रिडिंग, प्रथम चिकित्सा,पर्यावरण, एनसीसीचा इतिहास,सामाजिक जागृती,व्यक्तिमत्व विकास,भारत निसर्गामध्ये तरुणांचे योगदान,आपत्ती व्यवस्थापन राष्ट्रीय एकात्मता,इत्यादी बाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे.
या शिबिरामध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी व श्री.बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालयात पांढरकवडा येथील एन सी सी कॅडेट प्रशिक्षणामध्ये सहभागी होतील. या कॅम्पमध्ये लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी चे लेफ.रवि मत्ते व बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पांढरकवड्याचे मेजर अजय रेळे सर यांची शिबिराकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.
आदिवासी बहुल व जंगली विभाग असल्यामुळे वाघ व मानव संघर्ष, वाघाच्या सवयी व वाघापासून संरक्षण, या विषयावर प्रा. डॉ.रमजान विराणी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचे नियम माहिती व्हावे याकरिता वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांचे व्याख्यान आयोजित केले.
'जल संवर्धन' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे.उद्घाटन कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जलतारे सर उपस्थित होते. त्यांनी कॅम्प कमांडर कर्नल वेंकटरमन सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि त्यांच्या आयोजनास शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सुभेदार मेजर सुंदरलाल व बटालियनचे पी. आय. स्टाफ उपस्थित होते.
श्री.बा.दे. पारवेकर महाविद्यालयात एन.सी.सी. शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 09, 2021
Rating:
