राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेल च्या वतीने सत्कार

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (३० ऑक्टो.) : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका सचिव व काळी दौ च्या माजी सरपंच सौ साधनाताई आळणे यांची भाची कु. दिक्षा अरुण भवरे (मोहदी) हिने युपीएससी (UPSC) परीक्षेत राज्यात (STATE) दुसरा क्रमांक घेऊन यश संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग सेलच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आझाद पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती वहाब भाई, अनिल चवरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हंसराज मोरे, सामाजिक न्याय विभाग सेल चे तालुकाध्यक्ष उज्वल रणविर, शरद काळे, राजू राठोड, विश्वपाल ढोबळे, आदिंची प्रमुख्याने उपस्थित होते. सदर छोटेखानी कार्यक्रम अशोक आळणे यांच्या निवास्थानी कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेल च्या वतीने सत्कार राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक न्याय विभाग सेल च्या वतीने सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on October 30, 2021 Rating: 5
Powered by Blogger.