मोहदा गावाच्या विकासासाठी गौण खनिज निधी मिळवून द्यावा - सरपंच उपसरपंचांनी केली खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना मागणी
सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी (यवतमाळ) : वणी तालुक्यातील मौजा मोहदा येथे मोठया प्रमाणात खानपट्टा क्षेत्र असून, मोहदा हे गाव खानपट्टा बाधित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. या गावातून शासनाला रॉयल्टी च्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी प्राप्त होत आहे. त्या निधीमधून बाधित क्षेत्राना १० टक्के निधी खर्च करण्याचा शासन निर्णय असून सुद्धा आजपर्यंत एक रुपयाही मोहदा गावाच्या विकास कामासाठी मिळाला नसल्याचे येथील सरपंच उपसरपंचांनी निवेदनातून वणी आर्णी चंद्रपूर लोकसभेचे लाडके खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना माहिती दिली.
पुढे पदाधिकारी सांगतात की, येथे असलेल्या खानपट्ट्यामुळे वायू प्रदुषण, ध्वनी प्रदूषण, व जल दूषित होऊन त्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत असून गावात बिमारीचे साम्राज्य मोठया प्रमाणात फोफावत आहे. परिणामी उद्याचे भविष्य धोक्यात आले असे चित्र असताना गावाच्या विकास कामासाठी आमच्या गौण खनिज निधी मिळवून देण्यास आपण लक्ष घालावे. काही कामं आहेत त्या याप्रमाणे :
• मोहदा येथील पांदन रस्ते
• मोहदा येथील जल शुद्धीकरण
• मोहदा येथील व्यायाम शाळा
• मोहदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र
• मोहदा येथील संत गाडगेबाबा रंगमंच सौंदर्यीकरण
• मोहदा येथील अंतर्गत सिमेंट रस्ते बांधकाम.
प्रशासन लोकप्रतिनिधीनी वरील बाबीकडे पाठ फिरवली असून, निदान आपण तरी जातीने लक्ष घालून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावा अशी मागणी मा. खासदार साहेबांना येथील सरपंचा सौ. वर्षा राजूरकर व उपसरपंच सचिन रासेकर यांनी आज कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश व फलक प्रकाशन सोहळ्यात दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मोहदा गावाच्या विकासासाठी गौण खनिज निधी मिळवून द्यावा - सरपंच उपसरपंचांनी केली खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 18, 2021
Rating:
