सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (५ ऑक्टो.) : पांढरकवडा शहरातील स्थानिक आखाडा वॉर्ड परिसरातील प्रसिद्ध माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे १० ऑक्टोबर ला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जास्तीत जास्त रक्तदान शिबीर आयोजन करण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, आदर्श शिक्षक कॉलनी येथील माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे स्व.शुभम गेडाम, स्व.पृथ्वीराज पेंदोर, स्व.पिंटू गेडाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 10 ऑक्टोबरला गोटूल इंग्लिश मिडीयम स्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे दर वर्षी नवनवीन कार्यक्रम आयोजित केले जातात.
या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.
माऊली दुर्गोत्सव मंडळातर्फे '१० ऑक्टोबर'ला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 05, 2021
Rating:
